Government SchemesSchemesyojana

Adani Solar Panel Price : तुम्हालाही वीज बिलापासून मुक्ती हवी आहे का ? मग तुमच्याही घरावर बसवा अदानी कंपनीचे 3 KW चे सोलर पॅनल, किती खर्च करावा लागणार ?

Adani Solar Panel Price अलीकडे वीज बिलाचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. वीज बिलाच्या खर्चामुळे सर्वसामान्य नागरिक खूपच त्रस्त आहेत. यामुळे विजेसाठी अल्टरनेटिव्ह पर्याय शोधले जात आहेत. विजेसाठी आता सोलर पॅनल बसवण्याला विशेष प्राधान्य दिले जात आहे.
जर तुम्हीही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खासं राहणार आहे. कारण की, आज आपण अदानी कंपनीचे 3 KW चे सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तसेच आपण 3 KW चे सोलर पॅनल बसवल्यास किती वीज तयार होणार हे देखील थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे आजचा हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवा. Adani Solar Panel Price

3KW चे सोलर पॅनल किती वीज तयार करणार ?

अलीकडे घरांमध्ये विविध उपकरणांचा वापर वाढला आहे. शिवाय, आता येत्या काही दिवसात उन्हाळ्याला सुरुवात होणार असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरात आणखी वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत विज बिलाचा भार आणखी वाढेल. यामुळे विजेसाठी आता अनेकजण घरावर सोलर पॅनल बसवण्याचा प्लॅन आखत आहेत.

तुमचाही सोलर पॅनल बसवण्याचा प्लॅन असेल मात्र किती किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले पाहिजे हे तुम्हाला समजत नसेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जर तुमच्या घराचा वापर हा दिवसाला 12 ते 15 युनिट पर्यंत असेल तर तुम्ही तीन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले पाहिजे. Adani Solar Panel Price
तुमचा वापर यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला यापेक्षा जास्तीच्या क्षमतेचे सोलर पॅनल बसवावे लागणार आहे. तसेच तुमचा वापर यापेक्षा कमी असेल तर तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊन या सोलर पॅनलपेक्षा कमी क्षमतेचे सोलर पॅनल बसवायला हवे.

किती खर्च येणार ?

खरे तर सोलर पॅनलचा खर्च हा वेगवेगळ्या घटकांवर आधारित असतो. पण आज आम्ही तुमच्यासाठी सोलर पॅनलच्या किमती बाबत एक ढोबळ अंदाज घेऊन आलो आहोत. मित्रांनो, सोलर पॅनलचे आपल्याकडे दोन प्रकार विशेष लोकप्रिय आहेत.

पहिला प्रकार म्हणजे ऑफ ग्रीड सोलर पॅनल आणि दुसरा प्रकार म्हणजे ऑन ग्रीड सोलर पॅनल. यातील ऑफ ग्रिड सोलर पॅनलमध्ये सिस्टीम वीज साठवून ठेवते, ज्यामुळे तुम्हाला पॉवर आउटेज दरम्यान इन्व्हर्टरद्वारे साठवलेली ऊर्जा वापरता येते. यामुळे ऑन ग्रीडपेक्षा ऑफ गिद सोलर पॅनलचा खर्च अधिक असतो.
जर तुम्ही अदानी कंपनीचे 3KW चे सोलर पॅनल तुमच्याच्या घरावर बसवणार असाल तर तुम्हाला ऑफ ग्रीड सोलर पॅनलसाठी 2 लाख 85 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो दुसरीकडे ऑन ग्रीड सोलर पॅनलसाठी तुम्हाला एक लाख 50 हजार पर्यंतचा खर्च करावा लागणार आहे. Adani Solar Panel Price

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *