BlogLoan

Bank FD Interest Rate : देशातील ‘ही’ बँक 701 दिवसाच्या एफडीसाठी देणार 9.45% व्याज, गुंतवणूकदार बनणार मालामाल


Bank FD Interest Rate एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट ज्याला मराठीत मुदत ठेव म्हणतात यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढली आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये वाढ केल्यानंतर एफडीच्या व्याजदरात देखील मोठी वाढ झाली आहे आणि तेव्हापासूनच एफडी करण्याला विशेष पसंती मिळू लागली आहे

गुंतवणूकदारांना FD साठी चांगले व्याज

देशातील विविध बँका गुंतवणूकदारांना FD साठी चांगले व्याज देत आहेत. मोठ्या बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँक गुंतवणूकदारांना एफडी साठी चांगले व्याज ऑफर करत आहेत.

यामुळे अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि चांगल्या परताव्यासाठी एफडी मध्ये गुंतवणूक करत आहेत. Fixed Deposit मधून आता चांगला परतावा मिळू लागल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिक एफडी करण्याला विशेष महत्त्व देऊ लागले आहेत.

आधी महिला सोन्यात अधिक गुंतवणूक करत असत. आता मात्र फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे.


Bank FD Interest Rate विशेष बाब अशी की, देशातील जवळपास सर्वच बँका ज्येष्ठ गुंतवणूकदारांना एफडीसाठी अतिरिक्त व्याज ऑफर करत आहेत.

दरम्यान, आज आपण अशा एका बँकेची माहिती जाणून घेणार आहोत जी बँक 701 दिवसांचे एफ डी साठी तब्बल 9.45% एवढे व्याज ऑफर करत आहे.

कोणती बँक देते सर्वोच्च व्याजदर ?

युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना FD साठी खूपच चांगले व्याज वापर करत आहे. ही बँक 1,001 दिवसांच्या एफडीवर 9.50 टक्के व्याज देत आहे.

बँक सहा महिने म्हणजेच 180 दिवस ते 201 दिवसाच्या कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्के पर्यंत व्याजदर देते.

बँक जेष्ठ नागरिकांना ५०१ दिवसांच्या एफडीवर ९.२५ टक्के दराने व्याज ऑफर करत आहे. शिवाय, युनिटी बँक 701 दिवसांच्या FD व्याजदरावर ज्येष्ठ नागरिकांना 9.45 टक्के व्याज दर देत आहे. Bank FD Interest Rate
बँकेने 2 फेब्रुवारी 2024 रोजी नवीन व्याजदर लागू केले आहेत. यामुळे या बँकेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता चांगला परतावा मिळू लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *