Government SchemesSchemesyojana

Sukanya Samruddhi Yojana ; मुलीसाठी ‘या’ योजनेत नक्की गुंतवणूक करा, 21 व्या वर्षी होइल 70 लाखांची मालकीण

Sukanya Samruddhi Yojana प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी आपल्या उत्पन्नाचा भाग बचत करत असतो. काहीजण मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या लग्नासाठी किंवा त्यांच्या निवृत्तीसाठी ही गुंतवणूक करत असतात. त्यांचे पैसे जिथे सुरक्षित राहतील त्याच ठिकाणी ते गुंतवणूक करत असतात. केंद्र सरकारने देखील विविध गटांसाठी नवीन योजना आणलेल्या आहेत. मुलींसाठी देखील सरकारने खूप योजना आणलेल्या आहेत. यातील एक योजना खूप लोकप्रिय झालेली आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. (Sukanya Samruddhi Yojana) ही योजना मुलींचे शिक्षण त्याचप्रमाणे त्यांच्या लग्नापर्यंत सगळ्या गोष्टीसाठी मदत करते त्या.

सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2% व्याज उपलब्ध Sukanya Samruddhi Yojana


मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने ही योजना खूप लोकप्रिय आहे. आणि फायद्याची देखील आहे. या योजनेमध्ये जानेवारी ते मार्च 2023 या तीमाहीसाठी 8.2% दराने व्याज दिले जाते. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana) ही एक दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना आहे. जी तुमच्या मुलींना करोडपती बनवू शकते.

ही योजना जर तुम्ही मुलगी पाच वर्षाची असताना सुरू केली आणि दरवर्षी दीड लाख रुपये गुंतवले तर मुलगी जेव्हा 21 वर्षाची होईल. त्यावेळी तुमच्या हातात 69 लाख रुपये असतील. दर वर्षासाठी दीड लाख रुपये जमा करावे लागतात. त्यानुसार तुम्ही केलेली गुंतवणूक ही 22 लाख 50 रुपये असेल त्यावर 8.2% दराने व्याजदर पाहिला तर तुम्हाला हा या कालावधीत 46 लाख 77 हजार 578 रुपये मिळतील आणि तुमची मुलगी 21 वर्षाची झाल्यावर ती तिला लाख 27 हजार 538 रुपये मिळतील.

2015 पासून योजना सुरू | Sukanya Samruddhi Yojana


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुलींच्या भविष्यासाठी ही योजना 2015 मध्ये सुरू केलेली आहे. या योजनेत केवळ 250 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. याची जास्तीत जास्त तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यातील खास गोष्ट म्हणजे तुम्हाला 21 वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागणार नाहीत केवळ 15 वर्षापर्यंतच हे पैसे जमा करावे लागणार आहेत आणि 21 व्या वर्षी हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत.

हे खाते कोण उघडू शकेल?


सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, भारतीय रहिवासी आणि मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक असणे आवश्यक आहे. तुम्ही 10 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षे वयापर्यंत SSY खाते उघडू शकता. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 2 मुलींसाठी खाते उघडता येईल. जर जुळ्या मुली असतील तर तिघांसाठी SSY खाते उघडता येते.

तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढू शकता


SSY योजनेचा परिपक्वता कालावधी 21 वर्षे आहे. म्हणजेच, या कालावधीनंतरच संपूर्ण रक्कम काढता येते, परंतु मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर, या खात्यातून ही रक्कम अभ्यासासाठी देखील काढता येते. शिक्षणासाठीही खात्यात जमा झालेल्या शिल्लक रकमेपैकी केवळ 50 टक्के रक्कम काढता येते. यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणाशी संबंधित कागदपत्रे पुरावा म्हणून द्यावी लागतील. तुम्ही हप्ते किंवा एकरकमी पैसे घेऊ शकता, परंतु तुम्हाला ते वर्षातून एकदाच मिळेल आणि तुम्ही पाच वर्षांसाठी हप्त्यांमध्ये पैसे काढू शकता. Sukanya Samruddhi Yojana

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *