BlogGovernment SchemesSchemesyojana

Pradhan Mantri Matru Vandana Yojana : बाळाचा जन्म होताच खात्यात जमा होतील 6000 रुपये,सरकारच्या या योजनेचा लाभ कसा घ्याल?

Pradhan Mantri Matru Vandana Yojana सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. सरकारची अशी एक योजना आहे ज्यामुळे गर्भवती मातांना आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारने मातृत्व वंदन योजना लागू केली आहे. पंतप्रधान मातृत्व योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे उद्दिष्ट (PMMVY)

कामगार महिलांना मजुरी कमी झाल्याबद्दल भरपाई प्रदान करणे आणि त्यांना योग्य विश्रांती आणि पोषण सुनिश्चित करणे. गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांचे आरोग्य सुधारणे आणि रोख प्रोत्साहनाद्वारे अल्प पोषणाचा प्रभाव कमी करणे.

योजनेचे फायदे :

पहिल्या जिवंत बाळाच्या जन्मादरम्यान या योजनेचा लाभ गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना होणार आहे. योजनेच्या लाभाची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पाठविली जाईल. अहवालानुसार, सरकार पुढील हप्त्यांमध्ये रक्कम अदा करेल.

🤰🏻 पंतप्रधान मातृत्व योजनेसाठी पात्र महिलांना हफ्तांमध्ये 6000 रुपये रक्कम दिली जाते. देशभरात कुपोषण हा विषय गंभीर आहे. कुपोषण थांबवण्यासाठी सरकारकडून मातृत्व वंदन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांचे वय

🤷🏻‍♀️ सरकार 6000 रुपये मुलांच्या पोषणासाठी व आजारपणासाठी देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांचे वय 19 ते 55 वर्ष असायला हवे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये गर्भवती महिलांना दिले जातात. तर बाळ जन्मल्यानंतर 1000 रुपये महिलेच्या खात्यात जमा होतात.

👶🏻 तसेच या योजनेसंदर्भात माहिती हवी असल्यास हेल्पलाइनवर फोन करु शकता. व
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *