Government SchemesSchemesyojana

POCRA Scheme : ‘कृषी संजीवनी’ अंतर्गत साडेचार हजार लाभार्थ्यांना अनुदान..

POCRA Scheme राज्य शासनाने अत्याधुनिक शेती, नवनवीन प्रयोग, फळबाग लागवड आदींना चालना देतांना शेती शाश्वत विकासासाठी १७ फेब्रुवारी २०२२ ला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोकरा) घोषणा केली.तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील सर्व १४१ गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश झाला. तालुक्यातील ४ हजार ४४२ लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत २०२२-२३ व २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षात शेती विकासाच्या विविध घटकांसाठी ५४ कोटी ५७ लाख ६ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. POCRA Scheme


तालुक्यातील सुमारे साडेचार हजार लाभार्थ्यांना या अनुदानातून ठिबक सिंचन, शेततळे, अस्तरीकरण, शेतीशाळा, फळबाग लागवड, पाणी उपसा साधणे, शेडनेट, रेशीम उद्योग, तुषार सिंचन आदी कामे केली. POCRA Scheme

‘पोकरा’ योजनेअंतर्गत लाभार्थी व अनुदान स्थिती

घटक नाव अनुदान रक्कम लाभार्थी संख्या

ठिबक सिंचन १५ कोटी ९ लाख २४४२

फळबाग लागवड ४ कोटी ८ लाख १६७६

शेडनेट ३४ कोटी २०४

वैयक्तिक शेततळे १ कोटी ३ लाख ९१


शेततळे अस्तरीकरण २० लाख २२ POCRA Scheme

रेशीम उद्योग ७ लाख १६

शेतीशाळा १९ लाख ७

तुषार सिंचन ७२ लाख ३

पाणी उपसा साधणे १५ लाख १

या प्रकल्पात तालुक्यातील सर्व १४१ गावांचा समावेश झाला ही समाधानाची बाब आहे. योजनेसाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांसह सर्व घटकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. शेडनेट, ठिबक सिंचन यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला हातभार लागला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *