Government SchemesSchemesyojana

Free Sewing machine Scheme : एकही पैसा खर्च न करता करा स्वतः चा व्यवसाय सरकार देत आहे महिलाना मोफत शिलाई मशिन..

Free Sewing machine Scheme आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागू होऊ शकते. याआधी, 20 टक्के उपकराद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रशासकीय मान्यतेद्वारे लाभार्थ्यांची निवड न केल्यास, हा निधी पुढील आर्थिक वर्षात दायित्व ठरू शकतो. त्यामुळे जिल्हा समाज कल्याण विभागाने सहा दिवसांपूर्वी सर्व योजनांना प्रशासकीय मान्यता दिली असून, आता पात्र लाभार्थ्यांची निवड यादी अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी उपकराच्या माध्यमातून 100% अनुदानावर स्प्रिंकलर संच, झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन इत्यादी उपलब्ध करून देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. पंचायत समिती स्तरावर प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांच्या अर्जाची तपासणी करून या योजनांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. Free Sewing machine Scheme

शिलाईचा मशीन १०० टक्के अनुदान : Free Sewing machine Scheme

गरजू महिलांना शिलाईचा अनुभव आहे. अथवा यासंबंधी त्यांचा हाच व्यवसाय आहे.
अशा १४५ महिलांना शिलाई मशीन खरेदी केल्यानंतर त्यांना प्रत्येकी ९ हजार ३०० रुपये दिले जाणार आहेत.

स्प्रिंकलरवर 100% अनुदान

मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी स्प्रिंकलर संच खरेदीसाठी ६,९५० 200 टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत आहे.

योग्य प्रस्ताव प्राप्त झालेल्या 136 शेतकऱ्यांना प्रत्येकी 31,900 रुपये दिले जातील.

झेरॉक्स मशीनवर 100 टक्के अनुदान Free Sewing machine Scheme

झेरॉक्स मशिन व्यवसाय सुरू करण्यासाठी समाजकल्याण विभाग महिला व पुरुषांना 100% अनुदान देते.
यावर्षी 169 पुरुष आणि 185 महिलांच्या प्रत्येकी 43 हजार 70 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

पात्रता

अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त भटके विमुक्त जातीतील लाभार्थ्यांनाच या योजनांचा लाभ दिला जातो. हे लाभार्थी अल्प उत्पन्न गटातील असावेत.

कागदपत्रे

  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • स्वतःची अथवा भाडेतत्त्वावरील जागेचा दाखला Free Sewing machine Scheme

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *