Government SchemesLoanSchemesyojana

Dairy Business Loan : दुग्धव्यवसायाची कर्ज प्रकरणे निकाली काढा..,जाणुन घ्या सविस्तर माहिती..

Dairy Business Loan दूध व्यवसायासाठी प्रलंबित असलेली कर्ज प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याची निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले. डॉ. कराड यांनी मंगळवारी (ता. २३) नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, अमूल डेरी, पंचमहलचे व विविध बँकेचे अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून काही सूचना केल्या.


शेतकऱ्यांकडे घटते जमिनीचे क्षेत्र पाहता त्यांच्या अर्थकारणाला हातभार लावण्यासाठी दुग्ध व्यवसाय विस्ताराच्या अनुषंगाने मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे बैठक घेतली. या बैठकीला लीड बँक मॅनेजर महेश केदार यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट तसेच अमूल व पंचमहलचे पदाधिकारी उपस्थित होते. Dairy Business Loan

सविस्तर चर्चा

दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांच्या अडचणी नेमक्या काय, दुधाचे संकलन कसे वाढवता येईल. चिलिंग प्लांट उभ्या करण्यातल्या अडचणी काय याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

खासकरून वैजापूर, कन्नड, गंगापूर तालुक्यांत प्रति तालुका १० हजार शेतकरी दुग्ध व्यवसायात कसे सहभागी करून घेता येतील, त्यासाठी केंद्राच्या नेमक्या योजना काय, त्याविषयीची प्रशिक्षण देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.
बँकांना एक लाख साठ हजारपर्यंत दिशा निर्देशानुसार कर्ज देता येते.


त्यासाठी त्या शेतकऱ्यांकडे कुठलेही कर्ज थकीत नसावे. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व संबंधित बँकांमध्ये आपली खाते उघडून उलाढाल करणाऱ्या शेतकऱ्यांना काही बँकांनी कन्नड व वैजापूर तालुक्यात कर्जही दिल्याची बाब बैठकीत बँकांकडून मांडण्यात आली.

Also Dairy Industry : दुग्ध व्यवसायामुळे बसली संसाराची आर्थिक घडी

प्रशिक्षण, योजनांची माहिती महत्त्वाची ठरेलआजची शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय उपलब्ध करून देण्यासंदर्भातील योजना अंमलबजावणीची चर्चा प्राथमिक स्वरूपाची होती. या संदर्भात प्रशिक्षण घेण्यात येईल. प्रलंबित कर्ज प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यास प्राधान्य असेल.
याशिवाय नव्याने दुग्ध व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी आयोजित केले जाणारे प्रशिक्षण व योजनांची माहिती महत्त्वाची ठरेल, असेही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले. Dairy Business Loan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *