AgricultureBlog

Onion Irrigation Management : वातावरण बदलामुळे कांद्याचा वांदा, बुरशीजन्य रोगामुळे उत्पादनात घट…


Onion Irrigation Management : खानदेशात कांदा पिकाची स्थिती बरी आहे. परंतु वारंवार तयार होणारे ढगाळ वातावरण, विषम हवामान यामुळे पिकात बुरशीजन्य व अन्य समस्या तयार होत आहेत.
Jitendra Awhad यांच्या रामाच्या आहारावरील वक्तव्यावर Devendra Fadnavis यांची टीका खानदेशात यंदा कांद्याची लागवड घटली आहे. सुमारे १० ते ११ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड अपेक्षित होती. परंतु लागवड सुमारे ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. कारण पाऊसमान कमी राहिल्याने सर्वत्र जलसाठे कमी आहेत.

विहिरी, कूपनलिकांचे पाणी नंदुरबारातील नंदुरबार, नवापूर, शहाद्यातील काही भागासह धुळ्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा, जळगावातील पारोळा, भडगाव, बोदवड आदी क्षेत्रात जानेवारीतच झपाट्याने घटले आहे. Onion Irrigation Management

पाणी मुबलक नसल्याने अनेकांनी लागवड टाळली आहे. तर काहींनी लागवड कमी केली आहे. कांद्याऐवजी चारा पिकांची त्यातही कमी पाण्यात व लवकर हाती येणाऱ्या चारा पिकांची पेरणी केली होती. यामुळे कांद्याची लागवड सर्वत्र कमी झाली आहे.

कांदा लागवड Onion Irrigation Management

याशिवाय दर ऑक्टोबरमध्ये काही दिवस स्थिर होते. नंतर दरात सुधारणा झाली नाही. दरांवर दबाव होता. या अस्थिर चित्रामुळेही अनेकांनी कांदा लागवड केली. कांद्याचा खर्चही आता मंजुरी व खतांचे दर वाढल्याने अधिक झाला आहे. यात काही शेतकऱ्यांनी पिकातून नफा मिळेल यातून लागवड केली आहे.

जळगाव जिल्ह्यात यावल, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल या भागात कांदा पीक आहे. धुळ्यातील धुळे, साक्री भागातही लागवड झाली आहे. नंदुरबारात नंदुरबार व नवापूर भागात कांदा पीक आहे. अनेकांनी जानेवारीच्या सुरुवातीलाही लागवड केली. काही शेतकऱ्यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला लागवड केली आहे. Onion Irrigation Management

योग्य नियोजन करावे


पीक अडीच ते दीड महिन्याचे आहे. त्यात पक्वता येऊ लागली आहे. परंतु जानेवारी व या महिन्यात ऐन वाढीच्या पीक विकासाच्या कालावधीत ढगाळ व विषम वातावरण आहे. पहाटे गार वारा, दुपारी उकाडा अशी स्थिती असते. यात सिंचनासंबधी योग्य नियोजन करावे लागत आहे.


कारण पाऊस आल्यास पिकात हानी होऊ शकते. यातच मध्येच वीज बंद असते. त्यात उष्णताही वाढू लागली आहे. यामुळे पिकास पाण्याचा अधिकचा ताणही देणे शक्य नाही. यातही शेतकऱ्यांची सर्कस होत आहे. ढगाळ व आर्द्रतायुक्त वातावरणामुळे बुरशीजन्य रोग सक्रिय होत आहेत. Onion Irrigation Management

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *