AgricultureBlogGovernment SchemesNewsSchemestrendingyojana

Namo Shetkari Sanman Scheme : खुशखबर ! शेतकऱ्यांना दसऱ्याला धनलाभ , 87 लाख 50 हजार शेतकऱ्यांना गुरुवारी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता ..!

Namo Shetkari Sanman Scheme : पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनेदेखील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना एप्रिलमध्ये जाहीर केली होती. त्यानुसार ‘पीएम किसान योजने’च्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना ‘नमो किसान योजनेतून पहिला हप्ता गुरुवारी (दि. २६) पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हानिहाय संख्या रविवारी (२२) अंतिम केली जाणार असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.

येथून यादी चेक करा..!

पीएम किसान योजने’च्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना ‘नमो किसान योजनेतून पहिला हप्ता गुरुवारी (दि. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे.

पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे बँक खात्यांना ‘आधार’ची जोडणी करणे या निकषांची अंमलबजावणी पूर्णपणे करण्यात आली नव्हती. मात्र, पंधराव्या हप्त्यासाठी हे दोन्ही निकष आता बंधनकारक करण्यात आले आहेत.

दुग्धव्यवसायासाठी शेतकऱ्यांना मिळणार सुलभ कर्ज, काहीही गहाण ठेवावे लागणार नाही, पाहा योजना

Namo Shetkari Sanman Scheme

पीएम किसान योजनेमध्ये चौदाव्या हप्त्यासाठी राज्यातील ८५ लाख ६० हजार ७३ शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून मान्यता देण्यात आली होती. मात्र, ई-केवायसी व आधार जोडणी वेळेत पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांचे मागील थकलेले हप्ते चौदाव्या हप्त्यात समाविष्ट करून देण्यात आले होते. त्यामुळे ही संख्या अंतिम झालेली नव्हती, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

मात्र, राज्याच्या योजनेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे ई-केवायसी व आधार जोडणी निकष पूर्ण करण्याचे आदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यापूर्वी दिले होते. हे काम अजूनही सुरू असल्याने नमो किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यासाठी पीएम किसानच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी अंतिम करावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

ही उत्पादने दररोज लागतात घरात, तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करा ! तुम्ही 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.

सोमवारी पैसे बँकेत जमा होणार

त्यानुसार राज्यासाठीदेखील पीएम किसान पोर्टलसारखेच स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची जबाबदारी महाआयटीकडे देण्यात आली आहे. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले. रविवारी (दि.२३) जिल्हानिहाय शेतकयांच्या याद्या अंतिम होणार आहेत.

  • राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० कोटी रुपयांचा निधी दिला असून, लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी संबंधित बँकांकडे हा निधी सोमवारी वितरित केला जाणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
  • शिर्डी येथे गुरुवारी होणाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी नमो किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित करतील, त्यामुळे याद्या अंतिम करण्याचे नियोजन युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र, पीएम-किसान योजनेतील लाभार्थी संख्येच्या तुलनेत नमो किसान योजनेतील लाभार्थ्यांची संख्येत फार फरक पडणार नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *