BlogNews

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील ‘या’ 11 जिल्ह्यांना जोडणारा एक नवीन महामार्ग तयार होणार !

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात समृद्धी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई ते नागपूर यादरम्यान समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. यापैकी 600 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झालं असून हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

नागपूर ते भरविर हा 600 km लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गाचा उर्वरित भाग देखील लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचे नियोजन आहे.

एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर दुसरीकडे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणखी एका नवीन महामार्गाची पायाभरणी करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. Maharashtra New Expressway

मिळालेल्या माहितीनुसार राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राज्यातील सर्वाधिक लांबीच्या महामार्गाची लवकरच पायाभरणी होणार आहे. एम एस आर डी सी राज्यात नागपूर ते गोवा दरम्यान एक नवीन महामार्ग विकसित करणार आहे.
हा शक्तिपीठ महामार्ग राहणार असून यामुळे

राज्यातील अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्रे परस्परांना

जोडले जाणार आहेत. यामुळे भाविकांना सहजतेने

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी देता येणार आहे.

शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील 11 जिल्ह्यांमधून Maharashtra New Expressway

जाणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि

मराठवाड्यातील धार्मिक, औद्योगिक, कृषी, शिक्षण

इत्यादी क्षेत्राला उभारी मिळणार आहे.

नागपूर ते गोवा प्रवास आता फक्त 11 तासात

सध्या स्थितीला नागपूर ते गोवा हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तब्बल 21 तासांचा कालावधी खर्च करावा लागत आहे. मात्र जेव्हा शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे बांधून तयार होईल तेव्हा हे प्रवासाचे अंतर दहा तासांनी कमी होईल आणि नागपूर ते गोवा हा प्रवास फक्त आणि फक्त 11 तासात पूर्ण केला जाऊ शकतो असा दावा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

यामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास गतिमान होणार असून धार्मिक पर्यटनाला आणि औद्योगिक क्रियाकल्पांना मोठा वाव निर्माण होणार आहे. परिणामी राज्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित Maharashtra New Expressway होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार

हा महामार्ग पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या तीन विभागातील 11 जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आलेला राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार नाही. या महामार्गाची लांबी समृद्धी महामार्गापेक्षा 100 किलोमीटरने अधिक राहणार आहे.

शक्तीपीठ महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा महामार्ग राहणार आहे. हा मार्ग विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, बीड, परभणी, धाराशिव आणि लातूर, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधून जाणार आहे.

राज्यातील ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार

हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग महालक्ष्मी, तुळजाभवानी, पत्रादेवी या 3 शक्तिपीठांना जोडणार आहे. राज्यातील या तीन शक्तीपीठांना हा महामार्ग कनेक्ट करणार असल्यानेच याला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. तसेच, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ येथील दोन ज्योतिर्लिंगे जोडली जातील. त्याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर या महामार्गाला जोडले जाणार आहे. कारंजा, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी ही दत्ततीर्थक्षेत्रे स्थळे जोडली जातील. Maharashtra New Expressway

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *