BlogSchemestrending

Flipkart Big Diwali Sale : फ्लिपकार्ट वर 5G चे हे फोन मिळतायत अतिशय कमी बजेटमध्ये ! दिवाळीच्या सेलमध्ये या आहेत खास ऑफर्स..!

Flipkart Big Diwali Sale : विविध प्रोडक्ट्सवर चांगला डिस्काउंट मिळत आहे. त्याचबरोबर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची खासियत असलेले स्मार्टफोन देखील स्वस्तात विकले जात आहे. चला पाहूया ह्यातील टॉप ५ स्मार्टफोन डील्स.

येथून जाणुन घ्या ऑफर..!

दिवाळीच्या निमित्ताने अनेकजण नवीन वस्तू खरेदी करत असतात. ह्यात स्मार्टफोनचा देखील समावेश असतो. म्हणूनच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म दिवाळी सेलचे आयोजन देखील करतात. आता Flipkart नं आज २ नोव्हेंबर पासून Big Diwali Sale ची घोषणा केली आहे. ह्या सेलमध्ये अनेक प्रीमियम ब्रँड्सच्या स्मार्टफोन्स मोठा डिस्काउंट दिला जात आहे. पुढे आम्ही ११ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या ह्या सेलमध्ये मिळणाऱ्या बेस्ट स्मार्टफोन ऑफर्सची यादी दिली आहे, त्यामुळे तुमचं काम थोडं सोपं होईल.

बँक ऑफ इंडिया कडून मिळणार 20 लाखांचे वैयक्तिक कर्ज, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?

Motorola Edge 40

Moto Edge 40 जेव्हा लाँच झाला होता तेव्हा ह्याची किंमत ३४,९९९ रुपये आहे परंतु सेलमध्ये हा फक्त २६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन आयपी६८ रेटिंगसह येणारा सर्वात पातळ फोन आहे. फोनमध्ये ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेजसह डायमेंसीटी ८०२० चिपसेट मिळतो. हा फोन ६.५ इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ह्यात ५०एमपी + ८एमपी चा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो आणि ३२एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये ४४००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. महिन्याला कमवा 30 ते 40 हजार रुपये.

Google Pixel 7a

गुगलचा हा प्रीमियम अफॉर्डेबल डिवाइस ४३,९९९ रुपयांमध्ये आला होता. परंतु दिवाळी ३५,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ह्यात गुगलचा टेंसार जी२ प्रोसेसर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी ४३००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ६४एमपी + १३एमपी ड्युअल कॅमेरा आणि १३एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळतो. ह्यात ६.१ इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ८जीबी रॅम सह १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

Oppo Reno 10 5G

हा स्मार्टफोन कंपनीनं ३८,९९९ रुपये किंमतीत लाँच केला होता परंतु हा आता २९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ह्या फोनवर ४००० रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंट आहे. ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज असलेला हा डिवाइस मीडियाटेक डिमेन्सिटी ७०५० चिपसेटवर चालतो. ह्यात ६.७ इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळतो. ह्यातील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये ६४एमपी+ ३२एमपी+ ८एमपी सेन्सर आहेत. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. फोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Nothing Phone (2)

पारदर्शी बॅक पॅनलसह येणारा हा फोन ४९,९९९ रुपयांमध्ये लाँच झाला आहे. सेलमध्ये हा फोन एक्सचेंज डिस्काउंट नंतर ३३,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ प्लस जेन १ चिपसेटचा वापर केला आहे, सोबत १२जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज मिळते. फोमध्ये ६.७इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात ५०एमपी+ ५०एमपी ड्युअल रियर कॅमेरा आणि ३२एमपीचा सेन्सर मिळतो. डिवाइसमध्ये ४७००एमएएचची बॅटरी मिळते.

Samsung Galaxy S21 FE 5G

पावरफुल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरसह येणाऱ्या या फोनमध्ये प्रीमियम डिजाइन आणि कॅमेरा मिळतो. ह्या सेलमध्ये ६९,९९९ रुपयांच्या ऐवजी हा ३१,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनमध्ये ८जीबी रॅमसह १२८जीबी स्टोरेज मिळते. ह्यात ६.४ उंचच फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत १२एमपी+ १२एमपी+ ८एमपी चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ३२एमपीचा सेल्फी सेन्सर मिळतो. हा फोन ४५०० एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *